अखेर रावेरची जागा रा कॉ. ने काँग्रेसला सोडली

0

जळगाव.दि.29 –
जळगांवसह संपूर्ण राज्यात महायुतीसह आघाडीच्या टप्प्यानुसार जागा जाहिर होत होत्या मात्र रावेर लोकसभेची जागा काँग्रेसने वारंवार मागणी करून देखिल राष्ट्रवादी काँग्रेस काही केल्या सोडत नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जळगांवसह रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढविणार असल्याचे सांगीतले जात होते. परंतु उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीने एक पाऊल माघे घेत हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तिढा सुटला आहे . या जागेवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देते यावर दिल्ली दरबारी निर्णय होऊन नाव जाहीर करण्यात येेणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी आज शुक्रवारी काँग्रेस भवन येथे झालेल्य पत्रकार परिषदेत केले .
यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील,माजी आ. शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील ,महानगराध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
रावेर लोकसभेसाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यानंतर दिल्ली येथे पाठविण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भुसावळचे माजी आमदार नीलकंठ फालक , डॉ. जगदीश पाटील, मुनवर शेख , प्रा. हेमंत चौधरी आदींची नावे पाठविण्यात आली आहे. यावर आज शनिवार 30 रोजी निर्णय घेण्यात येणार आहे असे समजते
पुढे बोलताना संदीप पाटील म्हणाले कि काँग्रेसला रावेरची जागा मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. उमेदवारीसाठी 7 ते 8 जणांनी मुलाखती देखिल दिल्या होत्या .त्यातील पाच नावे वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आलेली आहेत.
काँग्रेसचे प्रबळ दावेदार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना रावेर लोकसभेसाठी उमेदवारीदिली जाण्याचे संकेत आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात काय कामे केली याचा संपूर्ण लेखाजोखा तयार असून तो आम्ही मतदारांपर्यत पोहचवणार आहे असे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले.
डॉ. उल्हास पाटील प्रबळ दावेदार
रावेर लोकसभा मतदार संघाची गतवेळेस राष्ट्रवादीकडे जागा होती . मात्र यंदा राष्ट्रवादीकडे भाजपविरुद्ध सक्षम उमेदवार नसल्याने आणि राष्ट्रवादीला या मतदार संघात फारशी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे काँग्रेसला हि जागा मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेत हि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. आता हि जागा काँग्रेसला मिळाल्याने स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
1996 साली डॉ. उल्हास पाटील काँग्रेसच्या तिकिटावरून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.