पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

0

भुसावळ दि.29-
भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असलेल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत घरात गळा आवळून खुन करुन तीचे अंगावरील दागीने चोरुन घेतल्या प्रकरणी पतीस भुसावळ जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी आज सक्त मजुरीच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली .
या प्रकरणातील साकरी,ता. भुसावळ येथील इंदिरा नगर मधील आरोपी महेंद्र रामपाल हरिजन हा पत्नी आम्रपाली व लहान मुलांसह राहत होता.त्याच परीसरात आम्रपालीच्या आईचे सुद्धा घर आहे.मात्र ती कामधंदया निमीत्त ,तीचे कुटुंबीयासोबत मिरा रोड मुंबई येथे राहत होती . दि.17 नोव्हेंबर2015 रोजी घटनेच्या रात्री आम्रपालीचे आई व इतर नातेवाईक हे साकरी येथे आलेले असताना आम्रपालीच्या पतीला तीच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याने वाद झाला व नंतर ते दोघे आपल्या घरी जाऊन झोपले. सकाळी आम्रपालीची आई तीचे घरी गेली असता ती तोंडास फेस आलेल्या व गळ्यावर व्रण असलेल्या अवस्थेत मृत आढळलीे . त्यामुळे तीची आई संगीता जाधव यांनी अगोदर अकस्मात मृत्युची खबर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दिली नंतर तीच्या अंगावरील दागीने सुद्धा गायब आढळले व गळयावर लालसर आवळल्याचे निशाण दिसले म्हणून तिच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 , 404 अन्वये आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यास जिल्हा न्यायालय खटला क्र. केस 14/16 असा सुरू होता .

Leave A Reply

Your email address will not be published.