मनपा आयुक्त डांगे यांची बदली.

0

सिंघम स्टाईल कार्य करणारे डांगे यांच्या जागी उदय टेकाळे यांची नियुक्ती

जळगांव- शहर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकात डांगे यांचा कार्यकाल वर्षभर देखिल पुर्ण झालेला नाही तरी देखिल त्यांची बदली अन्यत्र करण्यात आली असून त्यांच्या जागी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक उदय टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान मनपा आयुक्त चंदकात डांगे यांनी मे 2017 मधे शहर महानगर पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला. मे महिन्यात त्यांच्या आयुक्त पदी बदली झाल्यापासूनच डांगे हेे स्वतः जळगांव येथे येण्यास इच्छुक नव्हते अश्या वावड्या उठल्या होत्या. मात्र डांगे यांनी शहरासाठी स्वतःला झोकून प्रतिष्ठा पणाला लावून शहर विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन अंमलबजावणी देखिल केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढताना काही दुखावले असतील देखील त्याची कोणतीही तमा न बाळगता सिंघम स्टाईल प्रमाणे आपले कार्य सुरूच ठेवले. मनपाच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडून सर्वकाही ऑलबेल सुरू असतांना स्थानिक पदाधिकार्‍यांच्या प्रशासनातीन हस्तक्षेपामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ते स्वतः मात्र कार्य करण्यास अस्वस्थ असल्याचं जाणवत होते. जळगांव शहर मनपा आयुक्त पदावरून अन्यत्र बदली करण्याच्या प्रयत्नात होते. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या प्रमाणेच गेल्या दोन महिन्यांपासून ते आजपर्यंत अतिक्रमण हटाव धडक मोहीमेवरूनच अत्यंत कडक धोरणाचा अंवलंब केल्याने त्यांची बदली होणे अटळ मानले जात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.