अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

0

नवी दिल्लीः अक्षय तृतीयेच्या आधी सोने विकत घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव 229 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याप्रमाणेच चांदीचीही घसरण झाली. एक किलो चांदीची किंमत 717 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते डॉलरची मजबुती आणि अमेरिकन बॉन्ड उत्पन्नाच्या वाढीचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय.

सोन्याची नवीन किंमत 

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 229 रुपयांनी घसरून 47,074 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,303 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीची नवीन किंमत

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत बुधवारी 717 रुपयांनी घसरून 70,807 रुपये प्रतिकिलोवर गेली. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव 71,524 रुपये प्रतिकिलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. सोन्याचा भाव प्रति औंस 1832 डॉलर होता, तर चांदीचा भाव औंस 27.38 डॉलर होता.

Leave A Reply

Your email address will not be published.