कोरोना काळात सामान्यांची उपचाराच्या नांवावर आर्थीक लुट; ‘त्या’ ८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द करा :जलील पटेल

0

यावल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन , सर्वसामान्यांच्या उपचाराच्या नांवाखाली काही खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी आर्थीक लुट करण्यात येत असुन, राज्य शासनाने या सर्व खाजगी रुग्णालयांची तात्काळ चौकशी केल्यास मोठा आरोग्य उपचाराचा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असुन, जळगाव शल्यचिकित्सक यांनी केलेल्या ८ रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या नांवाखाली केलेली आर्थीक मोहास बळी पडुन केलेली कारस्थान खूप वाईट असून, सर्वसामान्य नागरीकांच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाले.

कोरोना या महाभयंकर आजारावरील रुग्णांना इतर रुग्णाप्रमाणे गैरवाजवी अव्वा की सव्वा बिल आकारून शासनाच्या आरोग्य नियमांचे उघड उघड उल्लंघन  झाले. याबाबत या सर्व रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे . या संदर्भातआपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांना पत्र पाठवुन या बेजबदार डॉक्टर आणि सर्व सामान्यांची आर्थीक लुट करणाऱ्या हॉस्पिटल यांचे परवाने रद्द करून या ८ रुग्णलयात किती गोरगरीब सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांना विनाकारणं पैसे भरायला लावून त्यांची आर्थीक व मानसीक फसवणुक करीत मनस्ताप दिला म्हणुन या संघर्षात त्या त्यांची मदत न करता त्यांची पिळवणूक केली म्हनून त्यांचे परवाने रद्द करून त्याना कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी आपण पत्राद्वारे करणार असल्याचे काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कोविड कंट्रोल रुमचे जिल्हाप्रमुख जलिल पटेल यांनी कळविले आहे तसेच आपण स्वतःहा जिल्हाशल्यचिकिसक डॉ.एन एस चव्हाण यांना भेटून अधिक माहिती जाणुन घेऊन तात्काळ कार्यवाहीची दिशा ठरवणार असल्याची त्यांनी सांगीतले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.