अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या दिवशी बहुतांश जण एक ग्रॅम का होईना पण सोने खरेदी करतात. याच पार्श्वभूमीवर  राज्यातील ठिकठिकाणचे सोने-चांदी आजचे दर जाणून घ्या.

आजचा सोन्याचे नवे दर 

आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 44 हजार 720 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 45 हजार 720 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45 हजार 900 इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 49 हजार 900 इतका आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे दर

जळगाव :

सोने- ४७ हजार ९१० रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदी – ७१,१३० रुपये प्रति किलो

नागपूर –

सोने- 45 हजार 750 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदी – 711 रुपये प्रति 10 ग्रॅम

नाशिक –

सोने – 47 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदी – 71 हजार 800 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 48 हजार 550 रुपये  प्रति तोळा

चांदी – 72 हजार 130 रुपये प्रति किलो

मुंबई  –

सोने – 45 हजार 490 रुपये  प्रति तोळा

चांदी – 72 हजार 130 रुपये प्रति किलो

Leave A Reply

Your email address will not be published.