तूर्त दिलासा : जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

0

मुंबई : सलग तीन दिवस दरवाढ केल्यांनतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज विश्रांती घेतली. कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर ‘जैसे थे’च असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९८.३६ रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९२.०५ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९८.८४ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९२.१६ रुपये झाला आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८९.७५ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८२.६१ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८७.४९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८५.४५ रुपये प्रती लीटर झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.