अँग्लो उर्दूच्या मुख्याध्यापकांकडून शिवीगाळ : पत्रकार हाजी इब्राहिम यांची तक्रार

0

धरणगाव – येथील अँग्लो उर्दू हायस्कूलची २५ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे कव्हरेज करण्यासाठी गेलेले पत्रकार हाजी शेख इब्राहिम यांना शाळेचे मुख्याध्यापक शकिलोद्दीन जमिलोद्दीन यांनी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याची तक्रार हाजी इब्राहिम यांनी केली आहे. सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी सर्व सभासद व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. भर सभेत शिवीगाळ झाल्यानंतरहमी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करेल असे आपण सांगितले तेव्हा मुख्याध्यापक यांनी उलट दम देत, मी त्यांना देखील पैसे देऊन मॅनेज करेल व तुमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करेल. माझे काहीच होणार नाही कारण मी शिक्षण विभागाला देखील असंच पैसे देऊन सर्व मॅनेज करतो आणि याचा तुम्हाला देखील अनुभव आहेच, असा दम मुख्याध्यापक यांनी दिल्याचा आरोप हाजी इब्राहिम यांनी केला आहे.
या प्रकाराची पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार असल्याची हाजी इब्राहिम यांनी लोकशाही शी बोलताना सांगितले.
एखाद्या वृत्तपत्र प्रतिनिधीला अशी वागणूक मिळत असेल तर मग सामान्य जनतेचं काय? असा सवाल हाजी इब्रहिम यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.