युवकाची दलालाकडून ५० हजाराची फसवणूक

0

एरंडोल (प्रतिनिधी) ; एरंडोल येथून थोड्या अतरावर असलेल्या बोरगाव ता. धरणगाव येथील रविंद्र सुरेश पाटील या युवकाने पन्नास हजार रु दलाला देवून नागपूर येथील एका युवतीशी लग्न संबध जोडला २५ सप्टेंबर  रोजी बोरगाव येथे विवाह सोहळा पार पडला. लग्नाला एक दिवस झाला तोज नव वधुने माझे खेड्यात मन लागत नाही, मला माहेरी नागपूरला पोहचुन द्या मला माझ्या दत्तक भावाने फसवले आहे. असा पवित्रा घेतला गावातील महिला व नागरिकांनी नववधूला समजून सागण्याचा पर्यत केला परंतु ती तिच्या भूमिकेवर ठाम राहिली. काही प्रतिष्टीत लोकांनी तिला बाईकवर बसून नागपूरला जाण्यासाठी एरंडोलला शनिवारी रात्री वाजता नेले. येथे हायवे चौफुलीवर आल्यावर तिला धरणगाव येथून रल्वेने नेण्यात नागपूरला नेण्यासाठी दुचाकीने नेण्यात आले.

यावेळी एरंडोल हायवे चौफुली वर बघे व उत्त्सुक्ते पोटी काही नागरिकांनी गर्दी केली. सदर विवाह माझ्या मना विरुद्ध झालेला आहे. माझा दत्तक भाहू व त्याच्या साथीदारांनी माझी फसवणूक केली आहे, असा आरोप नव वधूने बोलून धाखवला. मोठ्या शहरातीली हि वधू व बोरगाव सारख्या लहान खेड्यातील वर रविंद्र पाटील यांच्या विवाहला नागपूरहून तिच्या दत्तक भावा सह चार पाव्हणे व काही ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ५०००० हजार रु वाया गेले व त्या बरोबर माझी बायकोही मला सोडुन माहेरी निहून गेली. ती कायमची अशी वेदना रविंद्र पाटील या तरुणाणे व्यक्त केली.

दरम्यान समाजामधे दिवसेन दिवस मुलीची सख्या अधिका अधिक रोडावत असल्याने दलालाचा आधार घेहून लग्न जुळवण्याचा व त्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याचा घटना घडत आहे, हि मोठी चितेची बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.