भुसावळात आज एमसीआयएम नोंदणी केंद्राचे उद्घाटन

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी केंद्राचे उद्घाटन उद्‍या दि.२८ सप्टेंबर शनिवार रोजी एमसीआयएम मुंबईचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे.

सर्व आयुष डॉक्टरांचे,आयुर्वेद, युनानी डॉक्टरांचे एमसीआयएम  नोंदणी केंद्राच्या उद्घाटनासाठी भुसावळ यावल रावेर सावदा फैजपूर बोदवड वरणगाव जामनेर परिसरातील आयुर्वेदिक,युनानी डॉक्टरांनी आयएमए हॉल, भुसावळ येथे रात्री ८ वाजता हजर रहावे असे आवाहन एमसीआयएमचे सदस्य डॉ. रफिक अहमद डॉ.देवेंद्र शर्मा,डॉ.उमाकांत चौधरी,डॉ. एस.एन.पाटील व डॉ भोलाणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.