शेंदुर्णी येथे माथेफिरूने पोलीस चौकी जाळली

0

जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी येथील पोलीस चौकी एका माथेफिरूने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना आज घडली आहे.  समाधान बळीराम पाटील (रा. शेंदुर्णी) असे या माथेफिरूचे नाव असून त्याने पोलीस चौकी का जाळली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

समाधान पाटील हा आज सकाळी पेट्रोलची कॅन घेऊन पोलीस चौकी आग लावली. या आगीने  चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र, फाईल्स आणि साहित्य साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच कर्मचारी हजर होता. या पोलीस कर्मचाऱ्याने माथेफीरू यूवकास रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो असफल ठरल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अग्नीकांडमुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here