चौघा विरुद्ध गुन्हा : दोघांना अटक दोन फरार
भुसावळ दि . 19 –
शहरातील डी.एल. हिंदी विद्यालयातील शिक्षकांना मारहाण करून एका शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळातल्या शिवाजीनगर भागातील डी.एल. हिंदी विद्यालयात सोमवारी सायंकाळी परीक्षा संपल्यानंतर शिक्षिका या त्यांच्या शिक्षक पतीसोबत मोटर सायकल वरून घरी जाण्यासाठी निघाले . यावेळी शाळेच्या गेटजवळच रिक्षाने चार संशयित आरोपी अल्ताफ उर्फ कचोरी, आदिल शेख युनूस , जुनेन फिरोज कुरेशी व बबलू ( पुर्ण नाव माहीत नाही ) यांनी त्यांना अडवून शिक्षकांला मारहाण केली . व शिक्षकेचा विनयभंग केला . यावेळी या शाळेमधील एका शिक्षकांने आवरण्याचा प्रयत्न केला असता. त्या शिक्षकालाही संशयित आरोपींनी मारहाण केली. यानंतर रिक्षातून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून महिलामध्ये भीती पसरली आहे
दरम्यान रात्री उशीराने शिक्षीका हिने बाजारपेठ पोलीसांत दिलेल्या फिर्यादि वरुन संशयित आरोपी अलताफ कचोरी, अहिरा शेख युनुस, जुनेर फिरोज कुरेशी, बबलू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरूध्द कलम 354, 394, 427, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आदिल शेख युनूस व जुनेन फिरोज कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे .तर दोन आरोपी फरार आहे
दरम्यान, आरोपींना अटक करण्यात यावी या मागणी साठी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गर्दी जमा झाली होती. त्याचप्रमाणे अल्ताफ उर्फ कचोरी याचेवर यापूर्वी आर्म एक्ट ( शस्त्र बाळगणे प्रकरणी ) गुन्हा दाखल आहे .
या प्रकरणी पुढील तपास बाजारपेठ पोलीस उपनिरिक्षक मनोज ठाकरे , गुळीग यांच्यासह प्रशांत चव्हाण, उमेश पाटील, समाधान पाटील, छोटू वैद्य व अंबादास पाथरवट हे करीत आहेत.