ट्रक चालक व क्लीनरला पिस्तुलचा धाक दाखवून पांढर्‍या सोन्याची लुट

0

चाळीसगाव :-
औरंगाबाद हुन गुजरात कडे चाळीसगाव मार्गे जाणारा कापसाचा ट्रक अडवून ओमनी मधून आलेल्या चौघांनी कोदगाव बायपास जवळ ट्रकचा चालक आणि क्लिनरला पिस्तुलाचा धाक दाखवून ट्रक मधील कापूस चोरून नेल्याची अफलातून घटना चाळीसगावी मध्यरात्री नंतर घडल्याची तक्रार चाळीसगाव शहर पोलिसात ट्रक चालक भगवान गव्हाड याने दिल्यावरून सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
या घटनेची माहिती अशी की काल मध्यरात्री दीडच्या सुमारास चिखलठाणा जिल्हा औरंगाबाद येथील ट्रक क्रमांक एम एच 20 ,ई 71 35 वरील चालक आंबेहोळ, तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथील व्यापार्‍याचा कापूस ट्रक मधून अंजार जिल्हा भुज (गुजरात )येथे घेऊन जात असताना हा ट्रक चाळीसगाव शहरालगत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 52वर कोदगाव बायपासवर ओमनी मधून आलेल्या सात ते आठ जणांनी अडवून चालक आणि क्लीनर या दोघांना पिस्तुलचा धाक दाखवत आपल्यासोबत ओमनी मध्ये बसून रात्रभर इकडे तिकडे फिरवले यावेळी ओमनी तील काही जण तेथे उतरले आणि त्यांनी ट्रक मधील कापूस दुसर्‍या ट्रकमध्ये भरून तेथून पोबारा केला. सकाळी आठ वाजेपर्यंत ट्रक चालक आणि क्लिनरला पिस्तुलाच्या धाकाने फिरवल्यानंतर त्यांना मालेगाव धुळे आग्रा हायवे वर सोडून दिले . येथून चालक आणि वाहक पुन्हा कोदगाव बायपास वर येऊन पाहतो तर त्यांच्या ट्रक मधील कापूस लुटारूंनी लंपास केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठले या कापूस चोरीप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात लुटारू वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूर वाढ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.