साहित्य- 4 जणांसाठी
250 ग्रॅम पनीर
3 मध्यम आकाराचे कांदे(शिजवलेले)
2 मध्यम आकाराचे टमाटर (शिजवलेले)
दीड वाटी दूध
अर्धा इंच अद्रक
6 लसूण पाकळ्या
2 हिरवी मिरची
2 मसाला विलायची
2 तेजपत्ता
2 काळी मिरे
पाव इंच दालचिनी चा तुकडा
1 लहान चमचा जिरेपुड
1 लहान चमचा हळद
1 लहान चमचा गरम किंवा किचन किंग मसाला
1 मोठा चमचा लाल मिरची पुड (आवडी नुसार कमी-जास्त)
1 मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर (लाल रंग येण्यासाठी- तिखट-तेज नसते)
12 काजू – 4 चे मध्यातून 2 तुकडे
1 लहान चमचा टरबूज बी
3 मोठे चमचे साजूक तुप
1 लहान चमचा गुलाब जल
8 केसर काड्या
10 किसमिस
5 बदाम (एकाचे 3-4 तुकडे)
1 लहान चमचा कोथंबीर
4 चिमूटभर कसुरी मेथी
2 मोठे चमचे साय
चवीनुसार मीठ
कृती
स्टेप 1 –
पूर्व तयारी-
१) कांदे व टमाटर शिजवा.
२) शीजवलेल्या कांदा व टमाटर ची साले काढून मिक्सर च्या साहाय्याने पेस्ट तयार करून घ्या.
३) 8 काजू व 1 लहान चमचा टरबूज बी ह्यांची थोडे दूध टाकून पेस्ट तयार करून घ्या.
४) 4 काजू (मध्यातून 2) व बदामाचे तुकडे तयार करून घ्या.
५) अद्रक-लसूण-मिरची चांगली ठेचून ठेवा /पेस्ट करून घ्या (ह्या साठी संगमवरी लहान खल-बत्ता किंवा लाकडी बेडगी-ठेचू वापरा)
६) पनीरचे मध्यम आकाराचे त्रिकोणी तुकडे तयार करून घ्या.
७) मसाला विलायची दाणे, मिरे, दालचिनी कुटून पुड तयार करून घ्या.
स्टेप 2
पनीरचे त्रिकोणी तुकडे मध्यम उष्णतेवर 1 वाटी साजुक तूप / तेल गरम करून किंचित सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेले पनीर तुकडे हळदीच्या पाण्यात घाला म्हणजे बठरणार नाही मऊ राहतील.
स्टेप 3
फ्राय पॅन मध्ये 4 मोठे चमचे तूप/तेल मध्यम उष्णतेवर गरम करण्यासाठी ठेवा. तूप चांगले गरम झाल्यावर त्यात तेजपाने, कुटलेली मसाला विलायची, मिरे व दालचिनी टाकून अर्धा मिनिट परतावा.
स्टेप 4
अद्रक-लसूण-हिरवी मिरची ह्यांची पेस्ट फ्राय पॅन मध्ये घालून अर्धा मिनिट परतावा.
स्टेप 5
आता त्यात उकडलेल्या कांद्याची व टमाटर ची पेस्ट घालून मिश्रण च्या वर तेल दिसे पर्यंत किंवा 10 मिनिट मंद-मध्यम उष्णतेवर परतावा.
स्टेप 6
चवीनुसार मीठ, हळद, दोन्ही मिरची पावडर व गरम मसाला /किचन किंग मसाला घालून 1 मिनिट परतवा व काजू पेस्ट टाकून थोडे -10-12 सेकंद परतवून घ्या.
स्टेप 7
आता त्यात हळदीच्या पाण्यात बुडवले पनीर तुकडे घालून एकजीव करा व दुध , काजू-बदाम चे तुकडे , साखर घालून 3 मिनिट परतवून घ्या.
स्टेप 8
भाजी घट्टसर झाल्यावर त्यात गुलाबजल व किसमिस घालून थोडे 10-12 सेकंद परतवून घ्या.
स्टेप 9
केसर काड्या, कोथंबीर , साय घालून पराठा/नान/तंदुरी रोटी, पोळी, मोकळा भात सोबत सर्व्ह करा.
टीप-ही डिश तयार करण्यासाठी पाणी वापरू करू नका तसेच साजूक तूप वापरल्यास चविष्ठ लागते.
– विलासराव असोदेकर काका