राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर ‘आप’ची सत्ता

0

लातूर । गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी राज्यातील एका ग्रामपंचायतीवर चक्क आम आदमी पक्षाने सत्ता काबीज केली आहे.

 

लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नैत्रुत्वात लढवलेल्या निवडणुकीत ७ पैकी ५ जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर थेट दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.

 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर मराठीत अभिनंदन करताना म्हणाले कि, ”विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.”

Leave A Reply

Your email address will not be published.