चोपडा तालुक्यातील ४२ ग्रा.पं.निवडणुकीचे धक्कादायक निकाल ; माजी आ.दिलीप सोनवणेंच्या स्नुषाचा पराभव

0

 चोपडा :   चोपडा तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतीचा निकाल आज १८ रोजी जाहीर झाले असून या निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले असून काही ठिकाणी तरुणांना संधी मिळाली आहे, यात प्रामुख्याने  हातेड बु येथील माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे याच्या पॅनल च्या सहा जागा विजयी झाल्या असल्या तरी त्याच्या स्नुषा वर्षा चेतन सोनवणे यांचा मात्र पराभव झाला आहे.आजच्या या धक्कादायक निकालात चोपडा पंचायत समितीचे माजी तीन सभापतीना व दोन माजी उपसभापती याना गावकऱ्यांनी नाकारले आहे.त्यात वढोदा येथील गोकुळ पंढरीनाथ पाटील, वर्डी येथील माजी विनायक चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, खेडीभोकरी गावत माजी सभापती ऍड डी पी पाटील यांच्या पैनल ला मात्र गावकऱ्यांनी नाकारले असून माजी उपसभापती एम व्ही पाटील याचे मोहिदा व माजी उपसभापती माणिकचंद महाजन यांचे पैनल देखील पराभूत झाले आहे.

माजी सभापती आत्माराम म्हाळके याचे विरवाडे व डी पी साळुंखे यांचे कमळगाव गावात पॅनल जिंकून आले आहे तर चोसाका चेअरमन अतुल ठाकरे व व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे यांनी मात्र आपआपल्या गावात ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.तर चोसाका माजी चेअरमन यशवंत निकम याचा पैनलचा पराभव झाला आहे.

तर धक्कादायक निकाल म्हणजे बाजार समितीचे दोन विद्यमान संचालक भरत पाटील(चहार्डी),अरुण पाटील (वढोदा),भाजप तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या पत्नी—  पाटील घोडगाव ग्रामपंचायत मध्ये तर शिवसेनेचे तालुका संघटक सुकलाल कोळी याच्या पत्नी अरुणाबाई कोळी, यांचा चौगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे.

पहिला निकाल दहा वाजता बाहेर-

आज निवडणुकीचा पहिला निकाल सकाळी सव्वा दहा वाजता म्हणजे फक्त पंधरा मिनिटात निकाल जाहीर झाला होता.चहार्डी गावात सोळा जागासाठी निकाल हाती आल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक डॉ सुरेश पाटील यांचे बंधू डॉ अनिल पाटील हे स्वतः विजयी झाले असून दोन वाजून दहा मिनिटांनी एकूण ४२ गावाचे निकाल संपूर्ण हाती लागले होते.

या गावात मिळाल्या सर्वच्या सर्व जागा-तालुक्यातील खर्डी येथील माध्यमिक शिक्षक राधेश्याम पाटील यांनी स्वतः सह सर्वच्या सर्व नऊ जागा जिकल्या आहेत, चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे यांनी अनर्वर्दे येथे सात पैकी सात जागांवर विजय मिळवला आहे.चुचाळे येथे माजी मंत्री गिरीश महाजन याचे नातेवाईक शुभम चौधरी यांनी सर्व च्या सर्व जागांवर मोठा विजय मिळवला आहे.मोहिदा गावात डॉ पवन पाटील,माजी सरपंच मनोहर पाटील यांचे सर्व जागा विजयी झाल्या तर खेडीभोकरी गावात रणछोड पाटील व माजी सरपंच रवींद्र पवार,यांनी सर्व जागा जिकल्या आहेत.नागलवाडी गावात सेनेचे गोपाल पाटील,सचिन पाटील,श्रीकांत पाटील यांचे सर्व पैनल विजयी झाले आहे.वरगव्हाण येथे भूषण पाटील व रवींद्र पाटील यांचे पैनल विजयी झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.