यंदा राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘नो एन्ट्री’

0

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या दिमाखदार संचलनात २०१५ नंतर दोनदा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ यंदाच्या पथसंचलनात दिसणार नाही.

२६ जानेवारी निमित्त राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातून चित्ररथ सादर केले जातात. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी ‘मराठी रंगभूमीची १७५ वर्षे’ या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला गेला आहे.महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालचा चित्ररथाचा प्रस्तावही नाकारला गेला आहे. यंदा राजपथावर संचलनात एकूण २२ चित्ररथ सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here