माळी समाजाचा ५ जानेवारीला जळगाव येथे वधुवर मेळावा

0

– उपवर वधू वर यांना उपस्तीत राहण्याचे आवाहन

भुसावळ  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र माळी समाज महासंघ भुसावळ तालुका  बैठक आज सकाळी ११ वाजता वरणगाव येथे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांचे अध्यक्षतेखाली तर ज्ञानेश्वर महाजन (धरणगाव), डॉ नलिन महाजन(रवंजे) जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, भास्कर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, निलेश माळी, सौ प्रेरणा महाजन, ऍड वैशाली महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत महाराष्ट्र माळी समाज महासंघ, जळगाव जिल्हा आयोजित २० वा वधुवर मेळावा लाठी शाळा, पंचमुखी हनुमान मागे, जळगाव येथे रविवार दि ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० ते ४:०० ह्या वेळेत होणार असून यामेळाव्यासाठी उपवरवधू यांनी नावनोंदणी दि २५ डिसेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे करावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

उपवर वधू वर यांचे नाव नोंदणी फॉर्म जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, प्रदीप महाजन (भडगाव), शाम पाटील सर (कोळगाव), श्रीराम महाले, संजय महाले (पाचोरा), प्रशांत महाजन सर, सतीश महाजन सर (चाळीसगाव), गोकुळ रोकडे (सायगाव), प्रशांत माळी (पिंपळगाव हरे), सुरेश महाजन सर, नरेश महाजन (जामनेर), दीपक जाधव (पहुर), कैलास वेडू माळी, दिलीप माळी (बोदवड), भागवत बोंबटकर (तालखेडा), राजू माळी(मुक्ताईनगर), संतोष माळी (वरणगाव), निलेश माळी(भुसावळ), प्रल्हाद महाजन विनोद पाटील(रावेर), दिनकर माळी (साकळी), हनुमान महाजन(अडावद), ज्ञानेश्वर माळी, राजेंद्र महाजन (चोपडा), प्रा हिरालाल पाटील, मुरलीधर चौधरी (कळमसरे), दिनेश माळी, प्रा भीमराव महाजन (अमळनेर), प्रा नितीन चव्हाण (गांधली), वना माळी सर (पारोळा), गोपाळ बाविस्कर, ऍड शरद महाजन, ह भ प नाना महाराज (धरणगाव), दिनेश तायडे( अनोरे), बाळू महाजन, संजय महाजन (पाळधी), बाबूलाल माळी(तळई), राजेंद्र राघो महाजन (एरंडोल), डॉ नलिन महाजन (रवंजे), संजय महाराज, सुनील महाजन, विकास पाटील सरपंच(नशिराबाद), निर्मल मेडिको नेरी नाका, कृष्णा माळी ऑडिटर आंबेडकर मार्केट, आत्माराम तुकाराम माळी भाजीपाला मार्केट, टी एस महाजन हरीविठ्ठल नगर, सौ प्रेरणा महाजन खोटेनगर, ऍड वैशाली महाजन पिंप्राळा यांच्याकडे भरून द्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.