एरंडोल(प्रतिनिधी) – येथे आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एरंडोल शहर व तालुका कडून आदिवासी वस्तीत आवश्यक किराणा मालाचे किट व फळवाटप करण्यात आले.सुरुवातीला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.यावेळी समता परिषेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, मुरलीधर महाजन, रविंद्र माळी, भारती काळे, गजानन महाजन, एरंडोलचे तालुकाध्यक्ष अरुण महाजन, गजानन महाजन,शहराध्यक्ष सागर महाजन,गोकुळ महाजन,कैलास महाजन,उपनगराध्यक्ष योगेश महाजन,प्रसाद महाजन,राजधर महाजन,प्रमोद महाजन,प्रफुल्ल माळी, राकेश कंडारे, अनिल महाजन, गोपाल महाजन,कमलेश महाजन,विकी देशमुख, सचिन महाजन,मोहन महाजन,समाधान निकम, गोपाल महाजन,कल्पेश महाजन आदि पदाधिकारी उपस्थित होते.