लोहमार्ग पोलिसांची सतर्कता : दिल्लीतील तरुणीचा पालकांकडे ताबा

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  संतापाच्या भरात घर सोडून निघालेल्या दिल्लीतील तरुणीचा भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताबा घेत नंतर तिला पालकांच्या स्वाधीन केले. दिल्लीतील करोलबाग पोलिस ठाण्यांतर्गत रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी १२ रोजी गाडी क्रमांक ०६५२८ कर्नाटक एक्प्रेसच्या बोगी क्रमांक एस व बर्थ क्रमांक आठवरून निघाल्याची माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर भुसावळात गाडी येताच महिला पोलीस नाईक विजया जाधव व महिला कॉन्स्टेबल आशु शेट्टीयार व पोलीस हवालदार बर्वे यांनी गाडीतून मुलीचा ताबा घेतला. दिल्ली पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस हवालदार संत कुमार व तिचे आई-वडील लोहमार्ग पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा ताबा पालकांना देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.