तालुका अध्यक्ष पदासाठी पाचोऱ्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच

0

 पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्याचे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष पदासाठी दि. २३ रोजी निवडणूक होवु घातली असुन तालुका अध्यक्ष पदासाठी देविदास साळुंखे (तालुका अध्यक्ष, चाळीसगाव) तर शहर अध्यक्ष पदासाठी एस. आर. पाटील (तालुका अध्यक्ष, एरंडोल) यांची निवडणुक निरिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

भडगांव रोडवरील अल्पबचत भवनात दुपारी एक वाजता तालुका अध्यक्ष पदाची तर सायंकाळी चार वाजता शहर अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यात तालुका अध्यक्ष पदासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, युवानेते अमोल शिंदे, माजी शहराध्यक्ष दत्ता बोरसे, बाजार समितीचे सभापती सतिष शिंदे, भाजपाचे राज्य सदस्य डी. एम. पाटील, पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, तालुका सरचिटणीस प्रदिप पाटील, माजी तालुका अध्यक्ष हिम्मतसिंग निकुंभ यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तर शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी, माजी नगरसेवक रमेश वाणी, सुधीर पुणेकर यांच्यात चुरस असल्याचे बोलले जात आहे. चाळीसगाव तालुका व शहर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे व जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील यांची पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.