जळगाव मुस्लिम मंच साखळी उपोषणाचा दहावा दिवस

0
नववर्षानिमित्त जळगावकरांना साखर वाटून शुभेच्छा दिल्या; युनानी डॉक्टर असोसिएशनचा सक्रिय सहभाग
 
जळगाव – २३ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर नागरिकत्व कायदा रद्द करावा या मागणीसाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मंच तर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा दहाव्या दिवशी ख़ुद्दाम ए इन्सानियत फाउंडेशन जळगाव व युनानी डॉक्टर असोसिएशन जळगाव यांच्या सक्रिय सहभागाने हे उपोषण पार पडले.  उपोषणाची सुरुवात मुफ़्ती हारून यांच्या कुराण पठाणाने झाली. अध्यक्ष डॉ रियाज व  सचिव डॉक्टर फारुक शेख तसेच फाऊंडेशनचे अध्यक्ष आवेज हरून यांनी उपोषणाचे नेतृत्व केले.
 
 *नववर्षाच्या अशाही शुभेच्छा*
१ जानेवारी २०२० ही तारीख दहाव्या दिवसीय उपोषणाची ठरली जरी हा दिवस हिंदू किंवा मुस्लिम समाजाचा महिना नसला तरी मुस्लिम मंचने आपल्या उपोषणा मध्ये रस्त्यावर येऊन जळगावकर नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तोंड गोड करून दिल्यात सर्वांना नव-वर्षाच्या शुभेच्छा सोबत साखर खाऊ घातले व आपण आमच्या संविधान विरोधी  असलेल्या नागरिकत्व कायदा रद्द साठी  शासनाला नवीन वर्षात गोड बातमी देण्याविषयी आपल्या भावना कळवा असे आवाहन केले. रस्त्यावर डॉक्टर आपल्या  गळ्यात स्टेतो स्कोप सोबत असल्याने नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले होते.
 
*यांनी केले मार्गदर्शन*
 प्रतिभाताई शिंदे, करीम सालार, आयाज अली, डॉक्टर नदीम, डॉक्टर सज्जाद पटेल, डॉक्टर शाकीर शेख, हाफिस अब्दुल रही, डॉक्टर जावेद ,डॉक्टर अल्तमश,हाफिज शफी पटेल, फारूक अमीर सर, डॉक्टर अश्पाक काकर ,हाफिस वसीम
 पटेल, आसिफ सर व डॉ फारुक शेख यांची समायोचित भाषणे झाली.
 *दोन संघटनांचे दोन निवेदन* युनानी डॉक्टर असोसिएशन तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी कदम साहेब यांना डॉक्टर अल्तमश शेख, डॉक्टर मीना पटेल, डॉक्टर सज्जाद पटेल, डॉक्टर जाकिर खान ,डॉक्टर रहीस कासार, डॉक्टर जावेद ,डॉक्टर नदीम नजर ,डॉक्टर अताउर रहमान, डॉक्टर अलीम बागवान, डॉक्टर शाहिद पटेल यांनी निवेदन दिले.  दुसरे निवेदन होतं इन्सानियत फाउंडेशन तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्यावेळेस आवेश शेख, जाहिद शाहिद, शेख शादाब काकर ,आसिफ सर ,परवेश शेख, रईस शेख आणि  अब्दुल रहिम, राजिक पटेल आदी उपस्थित होते
 
यांची होती उपस्थिती
 डॉक्टर नदीम रहमानी, डॉक्टर मतीन खान, डॉक्टर अजिजुल ला, डॉक्टर जफर सय्यद, सरफराज, अजित खान शिकलकर, डॉक्टर रईस, डॉक्टर इमरान, फिरोज पिंजारी, खाटीक फैसल खान, डॉक्टर मंसूरी, डॉक्टर फारुख साबीर, डॉक्टर शाकीर शेख, डॉक्टर कामिल, डॉक्टर सायका शेख, डॉक्टर कामिल, डॉक्टर  शाही पटेल, वसीम अहमद, शफिक पटेल, राजीक पटेल,  डॉक्टर रहीस कासार ,इंजिनिअर अजहर, डॉक्टर शाहरुख खान, डॉक्टर फारुक शेख ,मोहनीश शेख कादर, शेख उमेज, डॉक्टर जाकिर खान, डॉक्टर मिनाज पटेल, आदींची उपस्थिती होती
Leave A Reply

Your email address will not be published.