भडगाव (प्रतिनिधी)-
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या
बेटी बचाओ बेटी पढाओ घोषवाक्य स्पर्धेत लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.अनुष्का योगेश शिंपी हिचा भडगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला. त्याबद्दल तिला 700 रुपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र पंचायत समितीच्या सदस्या डॉ. अर्चनाताई विशाल पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी मा.जालिंदर चित्ते, महिला व बाल कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. आर .कुमावत ,केंद्रप्रमुख रवींद्रकुमार सोनवणे ,वर्गशिक्षक व्ही. एस.पाटील तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ती योगेश शिंपी व दीपमाला जगताप या प्राथमिक शिक्षक असलेल्या दाम्पत्याची कन्या आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.