लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला
तुमाकुरू ;– काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही.शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे.
काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे . कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे , असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.