कर्जमाफीसह सरकारांच्या अनेक योजनांवर खडसेंची टीका, म्हणाले…

0

जळगाव :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे.  यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, यावर भाजप नेते  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कर्जमाफीसह सरकारांच्या अनेक योजनांवर टीका केली आहे.

गेल्या 75 वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही, असा दावा खडसे यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाची सरासरी यंदा अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने पंचनामे केले असेल तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपया सुद्धा पडला नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.