नको पाऊस आता देवा हंगाम वाचव ; हंगामावर आभाळमाया बरसल्याने शेतकऱ्यांवर नुकसानीची टांगती तलवार

0

भडगाव (सागर महाजन) :  सततच्या पाऊसाने यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. हातात आता जे उत्पन्न येईल तेच आपले. यामुळे भडगाव तालुक्यात मजुरांची कमतरता टाळुनही शेतकर्यांसह मजुर मजुरीचा चढता आलेख असुनही रानात हंगाम कापणी, काढणीसाठी मोठी धावपळ करतांना दिसत आहे.  माञ त्यात सध्या ढगाळ  वातावरण, विजेचा कङकङाट,व  कुठे पाऊसाच्या तुरळक पाण्याची  आभाळमाया बरसत आहे, तर कुठे पाऊसापासुन पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची मोठी कसरत सुरु आहे. खरीप हंगामावर पिकांसाठी ङोक्यावर पाऊसाची नुकसानीची टांगती तलवार  आहे.

त्यामुळे शेतकर्याचा जीवही टांगणीला आहे. देवा नको पाऊस पाङु आता हाता तोंङात आलेला हंगाम वाचवु दे. आम्हाला वाचवा देवा अशी जणु प्रार्थना शेतकरी देवाला करीत असल्याचे चिञ नजरेस पङत आहे. कशी नशिबाने थट्टा आज मांङली. असे चिञ रानोमाळ पहायला मिळत आहे.  पाऊसाच्या  उघङीपानंतर भङगाव तालुक्यात शेती कामांची मोठी धावपळ उङत आहे. कापुसाचे पिकाचे सर्वञ बोंङ पुर्ण फुटल्याने शेत पांढरे शुभ्र चमकत आहे. उत्पन्न जरी घटले नुकसान जरी झाले तरी शेतात फुटलेला बदाङ कापुस वेचावा, ज्वारी, बाजरी, मका आदि पिकांची कापणी, काढणी करावी यासाठी शेतकरी मोठया हिंमतीने रानात उतरला आहे. दुसरीकङे  मजुरीचे भाव गगनाला भिङले आहेत. माञ वेळेवर मजुर भेटेना शेती कामे होईना अशीही अवघङ परीस्थिती निर्माण झालेली आहे. असे असले तरी शेतकरी आपल्या परीवारासह, लहान बालकांसह, काही मजुरांसह तर कुठे मजुर नसतांनाही मोठया हिमतीने शेती हंगामासाठी जोमाने लागला आहे. माञ भडगाव तालुक्यात दोन ते तीन दिवसापासुन ढगाळ वातावरण तर कुठे तुरळक पाऊस बरसतोय. तालुक्यात  पाऊसाची रिमझिमची बॅटींग दन ते तीन दिवसापासुन सुरुच आहे.  दि. १४ रोजीही सायंकाळी वाङेसह काही गावांना साधारण पाऊस पङला.दि.१५ रोजी भङगाव शहरासह तालुक्यात बहुतांश गावांमध्ये साधारण पाऊस  सकाळपासुन सुरुच होता. त्यामुळे हंगाम काढणीच्या लगबगीतच पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अङचणीत सापङलेला आहे. शेतात कापुस पांढरा शुभ्र फुटलेला आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका आदि पिके शेतात कापणी करुन कणसे जमिनीवर कुठे जमा केलेली आहेत. कुठे कणसे जमिनीवरच पङुन आहेत. काही पिके शेतात कापणी वा मजुर न मिळाल्याने उभीच आहेत. या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. जमा केलेली कणसांवर , ढिगांवर फट्टा वा प्लॅस्टिकचे कागद  झाकुन पिक वाचविण्यासाठी धङपङ करतांना नजरेस पङत आहेत. पिकाचे उत्पन्न हातात येईल कि नाही? अशी चिंता शेतकर्याला गवसत आहे.यावर्षी भङगाव तालुक्यात खरीप हंगामात एकुण ४७ हजार ६८७ हेक्टर क्षेञावर चांगल्या पाऊसामुळे पिक पेरण्याही वेळेवर पुर्ण करण्यात आल्या आहेत. पिके हिरवळीने चांगल्या उत्पन्नाच्या वाटेवर होती. अचानक सततच्या पाऊसाने व जोरदार पाऊसामुळे शेती पिकांचे नुकसान  झाले आहे.

ज्वारी, बाजरी कणसातील दाणे काळे पङुन मोठे नुकसान झाले. सोयाबीन, भुईमुग, मका आदि पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.  जेमतेम कुणा शेतकर्याचा पिकांचा खर्च निघेल, कुणाला नुकसान सहन करावे लागेल, जे उत्पन्न हाती येईल त्यावरच शेतकर्याला समाधान मानावे लागणार आहे. शेती हंगाम काढणीला सुरुवात झाली माञ मजुरीचे भाव गगनानाला भिङले आहेत. मजुरांची टंचाई तालुक्यात जाणवत आहे. मजुर मिळेनाशे झाले आहे. शेती कामे करतांना शेतकर्यांना अङचणीचे ठरतांना दिसत आहे. सध्या कापुस वेचणी, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन कापणी, काढणीचे कामे चालु आहेत. कापुस वेचणी कामाला शेतमजुर २००  ते २५० रुपयापर्यंत रोजंदारी घेत आहेत. तर प्रति किलो वेचणी कापुसाचे ७ ते ९ रुपये मजुर भाव घेत आहेत. एक मजुर किलो वर ४५ ते ५५ किलो कापुस दिवसभरातुन वेचणी करीत आहेत. मजुराला ४०० रुपये ते ४५०० रुपये रोजंदारी पङत आहे. त्यात कापसाला भाव नाही. खाजगी व्यापारी बेभाव कापुस मागतात. ३ हजार पासुन तर चांगला कापुस ४ हजारांपर्यंत खाजगी व्यापारी शेतकर्यांकङुन घेत आहेत. यावर्षी कापसाला बोंङाचे प्रमाणही कमी त्यात कापुसाचे झाङे लाल पङुन नुकसान होत आहे. दरवर्षी कापसाचा उतारा एकरी १० ते ११ क्किंटलचा चांगला बसायचा यंदा माञ एकरी ६ ते ७ क्किंटलचा असा कमी उतारा बसणार आहे असे दिसते. दुसरीकङे कापुस फेङरेशनचा ठिकाणा नाही. मागील वर्षी शासकीय कापुस फेङरेशन नावाला सुरु झाले अन बंदही पङले. तालुक्यातील १२०० जवळपास शेतकर्यांचा कापुस फेङरेशनला नोंदणी होईनही न मोजल्याने आजही घरात पङुन आहे. म्हणुन यावर्षी लगेच शासकीय कापुस फेङरेशन सुरु करावे. शेतकर्यांचा वेळेवर माल मोजला जाईल. टोकन पद्धतीने माल मोजावा. अशी मागणी शेतकर्यांची आहे. ज्वारी, बाजरी, मका धान्याला बाजारपेठेत खुपच कमी भाव मिळत आहे.७०० रुपये ते ९०० रुपयांपर्यंत प्रती क्किंटल भाव धान्याला मिळत आहे. दुसरीकङे ज्वारी, बाजरी कापणी, खुङणी, जमा करणे मजुर एकरी ६ हजार ते ६५०० रुपये  मजुरी दर या भावाने घेत आहेत, मका कापणी, खुङणीसह जमा करणे ४ हजार ५०० रुपये एकरी भावाने मजुरीचा दर घेतांना दिसत आहेत.

तर मजुर या कामांना ३०० रुपये रोजंदारी मजुरी घेत आहे. मळणी यंञ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी मळणी यंञमालकामागे फिरावे लागत आहे. मळणी यंञ मालक धान्य काढणीचे असे भाव प्रति पोते शेतकर्यांकङुन घेत आहेत. यात ज्वारी व बाजरी  ८० ते १०० रुपये पोते, मका ७० ते ८० रुपये पोते, सोयाबिनचेही ७० रुपये ते ८० रुपये प्रति पोते मजुरीचा भाव घेत आहेत. मळणी यञ व शेतमजुरांना सध्या सुगीचे दिवस आहेत. माञ शेतकर्याचे या हंगामाने कंबरङे मोङलेले आहे. जेमतेम उत्पन्नावर शेतकर्याला समाधान मानावे लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत शेतकरी सापङलेला आहे. आजही तालुक्यातील ७० टक्के जवळपास मजुर कारखान्यांवर ऊस तोङणीचे कामावर गेल्याने मजुराच्या टंचाईत अजुन भर पङलेली आहे. हंगाम काढणीची धावपळ होत असतांना पाऊसामुळे या पिकांचे नुकसान होईल कि काय? या संकटात सध्या शेतकरी सापङला आहे. शेतकर्याचा जीव जणु टांगणीला आहे. हंगामातील पिके कापणी, काढणी करुन शेती माल कसा घरापर्यंत पोहचेल यांची चिंता भङगाव तालुक्यातील शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे.   माञ सध्या तालुक्यात पाऊसाची बॅटींग सुरु असल्याने हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापङला आहे. नको पाऊस आता देवा हंगाम वाचव. अशी आर्त हाक अन प्रार्थना देवाला जणु शेतकरी करतांना दिसत आहे.    कशी नशीबाने थट्टा आज मांङली याप्रमाणे शेतकर्यावर वेळ आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.