वानखेडेंच्या मेहुणीचा ड्रग्ज व्यवसाय? समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईचे झोनल एनसीबी अधिकारी  संचालक समीर वानखेडे  यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर व्यक्तीगत हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरच्या बहिणीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का?” असा नवाब मलिक यांनी सवाल केला आहे. समीर वानखेडे यांना उत्तर देण्याचं मलिकांनी आव्हान दिलं आहे.

‘तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या’ असे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.  हर्षदा रेडकर यांची न्यायालयात केस पेंडींग असल्याचे दाखवले आहे. यामध्ये हर्षदा रेडकर यांच्यावर २००८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च २०२२ मध्ये असल्याचे नमूद करण्यात आले असून आणखी दोन जणांचा या प्रकरणामध्ये समावेश आहे.

आता यावर समीर वानखेडेंनी आपली बाजू मांडली आहे. “क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल. मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालोय. २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध?”असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.