युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दि. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मु.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव होत आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांसाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. २७ सप्टेंबर पर्यंतची नोंदणीची मुदत आता विद्यापीठाने वाढविली असून १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.