फैजपूर ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील तळेगाव न्हावी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील तळेगाव न्हावी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुलगी ही मैत्रिणीकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरातील नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली, मात्र ती कुठेही आढळून आली नाही.
दरम्यान गुरुवारी २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देविदास सूरदास करीत आहे.