दहिगाव कोरपवली रस्त्यावर अवैध लाकूड साठा जप्त

0

 

यावल /जळगाव ;- तालुक्यातील दहिगाव येथे गुप्त बातमी वरून वनपाल वाघझीरा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा, वाघझिरा गस्ती पथकाने दहिगाव कोरपवली कच्च्या रस्त्याला तपासणी केली असता १८ जानेवारी रोजी अवैध इमारती लाकूड साठा आढळून आला.

जप्त मुद्देमाल इमारती नग 93 घ.मी.12.215, पंचरास जळाऊ थप्पी 11- घ.मी.115.512 एकूण माल किंमत 13,4031 रु. सदर गुन्ह्याबाब वनपाल हरीपुरा यांनी प्र.री.क्र. 1/2024 दि.18/01/2024 चा जारी केला आहे. सदरची हि कारवाई उपवनसंरक्षक यावल जमीर शेख सो. ,साहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे व वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या मार्ग दर्शनाखाली वनपाल वाघझिरा विपुल.दि.पाटील, अतिरिक्त कार्यभार वनपाल हरीपुरा ,वनरक्षक हनुमंत सोनवणे,सरला भोंगरे, अश्रफ तडवी ,अक्षय रोकडे आदींनी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.