महिला स्टार खेळाडू पुढील सामन्यास मुकणार ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महिला क्रिकेट टीम सध्या जास्त फॉर्मात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Australia) पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1 डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं. तर दुसऱ्या बाजूला भारतीय महिला क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मंधाना हीला दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागंल होतं. आता स्मृतीला विंडिज विरुद्धच्या सामन्यात खेळता येणार की नाही, याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया आज बुधवारी विंडिज विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्मृतीच्या दुखापतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.टीम इंडियाचे बॉलिंग कोच ट्रॉय कूली यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती विंडिजविरुद्धच्या सामन्याआधी फिट होईल, असा आशावाद कूली यांनी व्यक्त केला आहे. जर कूली यांचा अंदाज खरा ठरला तर स्मृती विंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.