व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई, तब्बल ‘इतके’ अकाउंट केले बॅन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात कोट्यवधी युजर्स आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने आता भारतातच मोठी कारवाई केली आहे. कंपनीने भारतातील तब्बल ६९ लाख अकाउंट्स बॅन केले आहेत. नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ही आकडेवारी १ ते ३१ डिसेंबर या काळातील असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. युजर्सच्या तक्रारींवर विचार करून, तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या काउंट्सची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचं कंपनीने आपल्या मासिक अहवालात म्हंटल आहे.

एकूण कारवाई केलेल्या अकौंट्सपैकी काहींवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर काही अकौंट्सवर कायमची बंदी लागू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात भारतातून व्हॉट्सअ‍ॅपला तब्ब्ल १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. असंही या अहवालातून स्पष्ट झालं आहे. एका महिन्यात प्राप्त झालेल्या या आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

नवीन फीचर्स
दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. व्हिडिओ कॉलमध्ये स्क्रीन आणि ऑडिओ शेअरिंग फीचरमुळे यूजर्स एकमेकांसोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर व्हिडिओ आणि मूव्हीज पाहू शकणार आहेत. तसंच इतर अ‍ॅप्समधून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणाऱ्या फीचरची चाचणी देखील सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.