WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल

0

Sandes App: व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. केंद्र सरकारकडून आज संदेस हे भारतीय मेसेजिंग अ‍ॅप लॉन्च केलं आहे.  केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘संदेस अ‍ॅप’बाबतची लेखी स्वरुपात माहिती संसदेत सादर केली.

WhatsApp चे भारतीय व्हर्जन मानले जातेय संदेसला

हे फेसबुकच्या मालकीचे WhatsApp चे एक भारतीय ऑप्शन आहे. मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीचे कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकतात. Sandes ला सध्या सरकारी कर्मचारी आणि एजन्सीकडून वापर केला जात आहे.

Sandes App फीचर्स मध्ये काय खास

संदेस एक ओपन सोर्स आधारित, सुरक्षित, क्लाउड इनेबल्ड प्लॅटफॉर्म आहे. याला सरकारकडून होस्ट करण्यात आले आहे. या अॅप मध्ये खूप सारे फीचर्स दिले आहे. WhatsApp च्या प्रमाणे या अॅपमध्ये युजर्स कोणालाही मेसेज पाठवू शकतो. तसेच ग्रुप बनवू शकतो. सोबत युजर्संना कोणतीही फाइल आणि मीडिया जसे, फोटो, व्हिडिओ, आणि ऑडियो पाठवू शकता. यात ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा दिली आहे.

WhatsApp ला टक्कर देण्यात यश येईल का

WhatsApp चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे एन्क्रिप्शन सिस्टम आहे. या अॅप मध्ये अँड टू अँड एन्क्रिप्शन आहे. दावा केला जात आहे की, सेंडर किंवा रिसिव्हर शिवाय, कोणीही तिसरा व्यक्ती ते वाचू शकत नाही. इतकच काय तर कंपनी सुद्धा याला वाचू शकत नाही. जर या अॅप मध्ये एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन नाही येत. तर हे व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यात यशस्वी होईल का. हा प्रश्न आहे. कारण, युजर्संची प्रायव्हसी महत्त्वाची आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.