नूतन मराठा गैरव्यवहार प्रकरणी, आठ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव  | प्रतिनिधी 

मराठा विद्याप्रसारक मंडळाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या चार वर्षाच्या मस्टरवर संस्थेच्या नसलेले कर्मचारी यांनी कर्मचारी असल्याचे भासवून बनावट सह्या करून शासनाची फसवणूक केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलेश भोईटे, प्राचार्य देशमुखांसह इतर पाच असे एकुण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या नुतन मराठा महाविद्यालयात १९ जुलै रोजी सात ते आठ जण उपप्राचार्याची कॅबिन बंद करुन खोटे व बनावट मास्टर तयार करत असल्याची माहिती मविप्रचे संचालक तथा प्रभारी अध्यक्ष अॅड विजय भास्करराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार अॅड पाटील यांनी काही जणांसोबत नूतन मराठा महाविद्यालय गाठले. याठिकाणी खोटे व बनावट मस्टर तयार करुन संबंधित जुन २०१७ ते २३ जुलै २०२१ या कालावधीतील चार वर्षांच्या खोट्या सह्या मस्टरवर करीत असल्याचे दिसुन आले. ॲड.विजय भास्करराव पाटील यांच्यासह काही जण आल्यानंतर संबंधितांची भंबेरी उडाली व त्यांनी पळ काढला. अॅड.विजय पाटील यांनी संबंधित बनावट मास्तरसह घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तु ताब्यात घेतल्या होत्या. निलेश भोइटे सह मविप्रचे कथित संचालक मंडळ व प्राचार्य एल पी देशमुख यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार सुरु असल्याचेही यावेळी अँड.विजय भास्कर पाटील यांना समजले. सात जण शासनाचे कुठलेही कर्मचारी नसताना त्यांच्या चार वर्षांच्या स्वाक्षऱ्या करून गेल्या चार वर्षांपासून ते नूतन मराठा संस्थेत काम करीत असल्याचे भासवुन संबंधितांनी स्वत च्या आर्थिक फायद्यासाठी कट रचून शासनाची व संस्थेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. अशी तक्रार अॅड विजय भास्कर पाटील यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरून नीलेश रणजित भोईटे रा भोईटेनगर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण देशमुख रा.महाबळ कॉलनी, उपप्राचार्य ए बी वाघ रा.शिवकॉलनी, शिवराज मानके, प्रकाश आनंदा पाटील, एम.ए धामणे, एन.एस.गावडे, ए.एस.भोळे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.