बंदुकीने ब्रश करायला गेला अन… (व्हिडीओ)

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क;

साधन उपलब्ध नसणं किंवा आवाक्याबाहेर असेल तर, त्यावेळी व्यक्ती काही न काही शक्कल लढवतो, आणि जुगाड लावतो. पण जर जुगाडच खूप भयंकर असेल तर ? असाच एक तरुणाचा जुगाडूपणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्याने चक्क घरच्याघरी इलेक्ट्रॉनिक टूथब्रशचा पर्याय म्हणून बंदुकीचा ब्रश तयार केलाय आणि त्याने टो ब्रश देखील करत आहे.

व्हिडीओत पाहू शकता तरुणाने साधा टूथब्रश घेतला आहे आणि तो बंदुकीत घुसवला. त्यानंतर त्याने बंदूक हातात धरून तोंडाजवळ नेली. तोंड उघडलं, बंदुकीला जोडलेला ब्रश तोंडात घातला आणि दात घासण्यासाठी त्याने ट्रिगर दाबली. त्यानंतर त्याचा ब्रश बंदुकीच्या ट्रिगरवर मागे पुढे होऊ लागला. जसं तो ट्रिगर दाबतो-सोडतो तसं टूथब्रश मागे-पुढे होतो.

https://twitter.com/AwardsDarwin_/status/1556732390147604480?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556732390147604480%7Ctwgr%5E4b04784401766e687067990f3490d6bb3deea499%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fman-fix-brush-on-gun-as-electric-toothbrush-shocking-jugaad-video-viral-mhpl-744068.html

इलेक्ट्रिक टूथब्रशसाठी तरुणाने सांगितलेला हा जुगाड खूपच विचित्र आहे. ही बंदूक असली आहे की नकली ते माहिती नाही. पण खरी बंदूक असेल तर यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून जितकं हसू येतं, तितकाच हा व्हिडीओ धक्कादायक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.