नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी थांबवली!

0

नाशिक | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३  मतपत्रिका जास्त आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. सध्या ही मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावर प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील २२ क्रमांकाच्या बुथवर ९३५  इतके मतदान झाले आहे, पण मतपेटीमध्ये ९३८  मतपत्रिका आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही मतपेटी बाजूला ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. मुख्य निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३० टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८०  कर्मचारी मतमोजणी करत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.