विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक मेजवानी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम आणि विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, श्रवण विकास मंदिर, डॉ अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभाग यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारीत नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास अनुक्रमे प्रमुख पाहुणे लोकमत वृत्तपत्राचे सहसंपादक विलास बारी, असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर सोनाली पांडुरंग पाटील, नेत्रज्योती हॉस्पिटलच्या एडमिनिस्ट्रेटर शितल खर्चे, दैनिक तरुणभारतचे उपसंपादक रविंद्र मोराणकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी, मुख्याध्यापिका कल्पना बाविस्कर, सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, सर्व विभाग प्रमुख व समनवयक व्यासपीठावर उपस्थित होते.

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातील नर्सरी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील (इयत्ता पहिली, दुसरी) दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीभूत कलाविष्काराने नुकतेच उपस्थित पालक वर्ग व रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर नृत्य सादर करून महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवली. तसेच इंग्लिश मीडियम व विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक विभागातील नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचा विविध सण हा विषय घेऊन नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सजावटीची सर्व कलाशिक्षक यांनी निर्मिती केली. तसेच गीत गायन व वादन संगीत शिक्षक व विद्यार्थी यांनी सादर केले.सर्व विभाग प्रमुख,मुख्याध्यापक, समन्वयक यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन रंगतरंग प्रमुख योगिता शिंपी यांनी केले. तसेच विवेकानंद प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख किरण सोहळे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.