विर जवान अमर रहे… शहीद जवान दत्तात्रय पाटील यांना अखेरचा निरोप

0

भडगाव ; तालुक्यातील भातखंडे येथील सैन्य दलातील शहीद जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांना शहीद जवान अमर रहे च्या घोषात साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
जवान दत्तात्रय पाटील यांना मंगळवारी वीरगती प्राप्त झाली. विर जवान दत्तात्रय पाटील अमर रहे च्या जयघोषात ३०५ फिड रेजिमेंट जवान दत्तात्रय पाटील यांच्या पार्थीववार शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

शहिद जवान दत्तात्रय पाटील यांच्या पार्थिवाला पोलीसांनी मानवंदना देण्यात आली. मुलगा चिन्मय आणि विणू यांनी अग्नीडाग दिला यावेळी आई प्रमीलाबाई, वडील विठ्ठल पाटील पत्नी ज्योतीबाई यांचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयातील वेल्फेअर ऑफिसर अनुरथ वाकडे, रतिलाल महाजन, भीमराव पाटील, जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस हेड क्वार्टर पथक प्रमुख, पोलीस प्रशिक्षक विजय शिंदे, माजी सैनिक अध्यक्ष बाळू पाटील, पाचोरा माजी सैनिक अध्यक्ष दिपक पाटील व कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी पाचोरा प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी रमेश वाघ, पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, राजकीय क्षेत्रातील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील, भातखंडे चे प्रथम नागरिक भागाबाई भिल, पारोळा मार्केट कमिटी चेअरमन अमोल चिमनराव पाटील, भडगाव माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील, दिनकर पाटील, देविदास पाटील, माधवराव पाटील संजय पाटील, भातखंडे येथील विविध संस्था पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.