ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; विजय कुमार (नेमबाजी)

0

लोकशाही विशेष लेख

विजय कुमार (Vijay Kumar) यांचा जन्म १९ ऑगस्ट १९८५ रोजी हारसूर, हिमाचल प्रदेश येथे झाला. त्यांचे वडील हे एक निवृत्त सैनिक होते. ते लहानपणी सतत आपल्या वडिलांच्या बंदुकीसोबत खेळात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हमीरपुर येथे झाले. त्यांचे वडील लष्करी अधिकारी असल्याने त्यांच्या घरात एकूणच अत्यंत शिस्तीचे वातावरण होते. या शिस्तीमुळेच त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही. त्यांना भारतीय लष्कराची मनोमन ओढ होती आणि आपले शालेय शिक्षण पूर्ण होताच २००१ साली त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण करत भारतीय लष्करात प्रवेश प्राप्त केला.

त्यांना नेमबाजीची खरी आवड हि २००१ साली भारतीय सेनेत भरती झाल्यावरच लागली. ते सुरुवातीला डोगरा रेजिमेंटमध्ये सुभेदार मेजर म्हणून रुजू झाले. काही काळाने २००३ साली त्यांची बदली आर्मी मार्क्समन युनिटमध्ये झाली. हे युनिटमध्ये  प्रदेशातील महु येथे कार्यरत होते. येथे त्यांना आपले पहिले प्रशिक्षक स्मिर्नोक परेल भेटले. या रशियन प्रशिक्षकाने त्यांच्याकडून रोज पाच ते सहा तास सराव करून घेतला. तसेच सनी थॉमस हे त्यांचे राष्ट्रीय स्तर मार्गदर्शक होत. ते २५ मीटर रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सहभागी होतात. २००६ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. त्यानंतर २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्ण व एक रौप्य अशा चार पदकांची कमाई केली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताला वैयक्तिक रौप्य पदक प्राप्त करून दिले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, विजय कुमार यांना २००७ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २०१२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna), २०१३ मध्ये भारतीय लष्कराद्वारे अति विशिष्ठ सेवा मेडल आणि २०१३ मध्ये पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित करण्यात आले.


डॉ. निलेश जोशी
जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.