#Video : यूपी : दोन ट्रकचा भीषण अपघातात २४ मजूर जागीच ठार

0

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर मजूर हे राजस्थान येथून आपापल्या घरी जाण्याकरता ट्रकमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या ट्रकला उत्तर प्रदेशातील औरैया येथे अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले बहुतेक मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील असल्याचे समजत आहे. औरैया चे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्याने अनेक ठिकाणहून मजूर आपआपल्या गावी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. परिणामी त्यांना अशा अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, मागील काही आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ८ मे रोजी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. मध्य प्रदेशमध्ये ९ मे रोजी झालेल्या अपघातामध्ये नरसिंगपूर जिल्ह्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.