Video : कोरोना नियमावलीची एैशीतैशी ; युपीत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

0

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर सुरू आहे.  याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशामध्ये कोरोना नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. बदायू जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी कोरोना संकट असताना अशा घटना घडत असल्याने टीकेची झोड उठवली आहे. मुस्लिम धर्मगुरु हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच लोकांनी लॉकडाऊन असतानाही अंत्ययात्रेसाठी मोठी संख्येने गर्दी केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, बदायू येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत मशिदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बदायूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बदायूमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 188 तसेच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.