महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटासाठी घोषणा तर झाली, पण लस अजूनही मिळेना?

0

धानोरा (विलास सोनवणे) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठमोठ्या ऑर्डर्स, आर्थिक तरतूद आणि मोफत लशीची घोषणा करण्याची स्पर्धा जणू सगळ्या राज्यांमध्ये लागलेली असतांना, एवढ्या लशी आणणार कुठून या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणीही देत नाही. राज्यांची सरकारंही देत नाहीत आणि केंद्र सरकारही देत नाही.

एकीकडे नावालाच देश कोरोनामुक्त करण्याचे मोठेमोठे प्रयत्न….?
कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. त्यानुसार आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे ही लसीकरण 1 मेपासून सुरू करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. पण राज्यातील या वयोगटातील अंदाजे साडे पाच कोटी नागरिकांना 1 मे पासून लस घेता येईल की नाही याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण 1 मे होऊन आठवड्याच्या वरती झाले असताना अजूनही केंद्राकडून 18 ते 44 वयोगटासाठी लसीचे डोस मिळालेले नाहीत, ते कधी मिळणार याचे उत्तर नाही. तर यासाठीच्या गाइडलाइन्स ही अजून आलेल्या नाहीत?.तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळेल तरी कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.