वर्धा येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल, पेंटर, सुतार) पदांच्या एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा
भरले जाणारे पद : शिकाऊ उमेदवार
मेकॅनिक – 60 पदे
वेल्डर – 03 पदे
शीट मेटल वर्कर – 12 पदे
टर्नर – 02 पदे
इलेक्ट्रीशियन – 07 पदे
पेंटर – 07 पदे
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग – 01 पद
सुतार – 01 पद
पद संख्या – 93 पदे
वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. ५९० / –
अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रु. २९५ /-
नोकरी करण्याचे ठिकाण – वर्धा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक.
2. उमेदवार संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरील ऑनलाईन शिकाउ नोंदणी (अप्रेंटीस रेझिस्ट्रेशन).
आय.टी.आय.(संबधित व्यवसाय) गुणपत्रिका जोडावी.
एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षा पासची गुणपत्रिका.
शाळा सोडल्याचा दाखला

महाराष्ट्र शासनाने निधारीत केलेल्या सन १९८६ नंतरचे नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र सुधारीत नमुन्यातील आधार कार्ड.
इत्यादी कागदपत्रे मा. विशेष दंडाधिकारी किंवा शासकीय अधिकारी किंवा स्वसाक्षांकित स्वाक्षरी करूण प्रमाणित केलेली एक झेरॉक्स सत्य प्रत अर्जासोबत जोडावी.

असा करा अर्ज
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट- http://msrtc.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.