कपिलवस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील जाडगाव व दिपनगर जवळील कपील वस्ती लगत मोटर सायकलवरून वरणगाव कडे जात असताना अज्ञात वाहनाने दिलल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली

तालुक्यातील तळवेल येथील मिलींद भागवत राणे (४० ) हा तरुण भुसावळ येथुन मोटर सायकल क्र एम एच १९ सी ७१७१ ने घराकडे येत असताना जाडगाव , दिपनगर जवळील कपील वस्ती लगत कोणत्या तरी अज्ञात वाहनाने मोटरसायकलीस मागून जोरदार धडक दिल्याने मिलीद राणे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत राणे हा भुसावळ नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कामगार होता त्याच्या पश्च्यात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.