नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय.आर.जी केअरतर्फे लसीकरण शिबिर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज स्व. शांताबाई बाबुराव पाटील सभागृह, व्यंकटेश कॉलनी. जळगाव येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि वाय आर जी केअरतर्फे कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण शिबिर संपन्न झाला.

या शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. त्या अनुषंगाने नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था, वाय.आर.जी. केअरतर्फे व आरोग्य विभाग जळगाव तसेच जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने लसीकरण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन महापौर मा जयश्री महाजन, नगरसेवक नितीन बरडे, बंटी जोशी, मराठा सेवा संघाचे राम पवार तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, वैशाली झाल्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संगीता चौधरी, नूतन तासखेडकर, भाग्यश्री महाजन, नेहा जगताप, किमया पाटील, योगिता बाविस्कर, योगिता ठाकूर, सुनिता पांडव यांची उपस्थिती होती. ज्योती राणे, रेणुका हिंगू, भारती कापडणीस, शशी शर्मा यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.