मराठी चित्रपटांची जादू कायम

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्याप्रमाणे पाश्चिमात्य चित्रपटताना प्रेक्षकांना वेड लावले आहे त्याच प्रमाणे मराठी सिनेमासुद्धा प्रेक्षकांना वेड लावत आहे. सर्वप्रथम रितेश देखमुख (Ritesh Dekmukh) दिग्दर्शित “वेड” या चित्रपटाची जादू हि सर्व प्रेक्षकावर झाली. आणि आता परेश मोकाशी (Paresh Mokashi) दिग्दर्शित ‘वाळवी’ (vaalvi) या मराठीतल्या पहिल्या थ्रिलकॉम चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. हेच यश साजरं करण्यासाठी चित्रपटाच्या टीमकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्टीत आता ‘वाळवी 2’ची घोषणा करण्यात आली आहे. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘वाळवी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचं जाहीर केलं.

याविषयी निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला वाळवी 2 ची प्रेरणा मिळाली. वाळवीमध्ये ज्याप्रकारे अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यापेक्षाही जास्त सस्पेन्स आणि थ्रील वाळवी 2 मध्ये असेल. सध्या तरी हे सगळं गुपित आहे.”

झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी या सीक्वेलबद्दल म्हणाले, “या यशात दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत वाळवीला पोहोचवलं. लवकरच आता वाळवी 2 हा थ्रीलकॉम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.” वाळवी 2 मध्ये कोणते कलाकार असतील हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.