टीमवर्क हाच प्रगतीचा आधारस्तंभ – डॉ.उल्हास पाटील

0

गोदावरी फाऊंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिवस जल्‍लोषात

जळगाव – आज आपण ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. आजचा हा दिवस अनेक क्रांतीकारकांनी दिलेल्या बलिदानामुळे तसेच त्यांच्यातील एकता आणि सहकार्याच्या भावनेमुळे पाहू शकतो. हे सर्व टीमवर्कमुळेच शक्य झाले. कारण स्वातंत्र्याचा प्रवास सोपा नव्हता. असेच टिमवर्क आपल्या गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील सेवेतूनही दिसून येते. येथील नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर्स, तज्ञ डॉक्टर्स या सर्वांच्या एकत्र येण्यामुळे रुग्णालयाची प्रगती झाली टीमवर्क हाच प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी व फिजीओथेरपी महाविद्यालया यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.अमृत महाजन, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, संचालक शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.डी.बी.पाटील, फिजीओथेरपीचे प्राचार्या डॉ.जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले, हॉर्टिकल्चरचे प्रा.सतीश सावके, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे, सिनीयर डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.बापूराव बिटे, डी टी राव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुशरा खान व विक्रांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमातून अवरतली देशभक्‍ती
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकला विद्यार्थी चिन्मय आडे याने स्वांतत्र्य दिनानिमित्‍त सुंदर भाषण दिले. त्यानंतर उत्कर्ष भोसले यानेही मनोगत व्यक्‍त केले तर प्रा.डॉ.अमृत महाजन यांनी है प्रित यहा की रित सदा व प्रा.अनुराग मेहता यांनी मेरा रंग दे बसंती हे गीत गायिले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी भारत हमको जान से प्यारा हे गीतावर सामूहिक नृत्य सादर केले.

अ‍ॅण्टी रॅगिंग विकनिमित्‍त रॅली
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ ऑगस्ट पासून अ‍ॅण्टी रॅगिंग विकला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी महाविद्यालय परिसरात प्रा.डॉ.बापूराव बिटे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स घेऊन जनजागृती केली.

सावदा सीबीएसई स्कूल
सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलमध्ये संस्थेचे प्राचार्या भारती महाजन तसेच सावदा पोलीस स्टेशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड, सामूहिक सिक्कीम भाषेतील गीत गायन स्पर्धा ,भाषणे, पर्यावरण जागृती नाटिका असे कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन लुकीता चोपडे व ज्ञानेश्वरी यांनी तर आभार अभिजीत तायडे यांनी मानले.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन एस आर्वीकर, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी, प्रा. एन जी चौधरी उपस्थित होेते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. ईश्वर जाधव व डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, हरिभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.