Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»वन्य प्राण्यांची सूरक्षा ऐरणीवर,वाघिणीच्या गळ्यात आढळला फास
    महाराष्ट्र

    वन्य प्राण्यांची सूरक्षा ऐरणीवर,वाघिणीच्या गळ्यात आढळला फास

    Tushar BhambareBy Tushar BhambareJanuary 28, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    नागपूर : वन्य प्राण्यांची सूरक्षा ऐरणीवर,वाघिणीच्या गळ्यात आढळला फास. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये गळ्यात फास (सापळा) असलेल्या वाघिणीचे छायाचित्र आले आहे. यामुळे वनविभागात खळबळ उडाली असून वाघांची सुरक्षा आणि शिकाऱ्यांच्या सक्रियतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. येथे टी-४१ या वाघिणीच्या गळ्यात फास आढळून आला आहे. विशेष म्हणजे कॅमेरा ट्रॅपच्या ठिकाणापासून कृषी क्षेत्र अंदाजे एक किलोमीटर अंतरावर आहे.

    या वाघिणीची अधिक माहिती मिळविण्यासाठी मागील कॅमेरा ट्रॅप रेकॉर्डचे विश्लेषण वनविभागाच्या पथकाने केले असता पश्चिम पेंच, सालेघाट आणि नागलवाडी भागातून ही वाघीण आली असल्याचे निदर्शनास आले. शोध घेण्यासाठी विभागाने अधिक कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत.

    या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाने जंगलातील पगमार्क शोधून माग काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी एकूण नऊ गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. कॅमेरा ट्रॅपची संख्याही वाढविण्यात आली आहे.

    गावकऱ्यांना सावधगिरीचा इशारा

    वनविभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या आणि जंगलात न जाण्याच्या सूचना दिल्या आहे. परिसरात असलेल्या गावातील सरपंच, वन समित्यांचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून त्यावरून माहितीची आदानप्रदान केली जात आहे. प्रादेशिक नागपूर वनविभागाला सतर्क करण्यात आले आहे.

    दुसरी घटना

    गळ्यात फास घेऊन फिरणारी वाघीण दिसण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वरोरा-भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील जंगलात एक वाघीण गळ्यात फास असलेल्या स्थितीत कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आली होती. तिच्या गळ्यातील फास कायम असताना ही दुसरी घटना पुढे आली आहे.

    Nagpur news Tiger
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif