थोरगव्हाण येथे दारु बंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासह दारु विक्रेत्याच्या घरावर काढला मोर्चा  

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण गावात ग्रामपंचायतने आयोजीत केलेल्या ग्रामसभेत गावात सुरु असलेली अवैध दारु विक्री कायम स्वरुपी बंद करण्याचा ठराव करीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व गावातील महिला व पुरुष यांनी थेट दारु विक्रेत्याच्या घरासमोर जावून दारु बंद करण्याची मागणी केली आहे.

थोरगव्हाण ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच मनिषा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. ग्रामसभेत ग्रामसेवक भरत पाटील यांनी अंजेडा वरील विषय उपस्थित ग्रामस्थ व महिलांना वाचून दाखविले.

गावात अवैधपणे हातभट्टीची दारु व देशी विदेशी दारु पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राजरोजपणे खुलेआम विक्री होत असल्यामुळे गावात अनेकांची घरे उद्ध्वस्त होत आहे तर काही किरकोळ वाद होऊन शांतता भंग होत असल्यामुळे संतप्त महिलांनी गावातील दारु बंदी कायमस्वरुपी करण्यासाठी महिला सरपंच मनिषा सोनवणे यांना निवेदन दिले.

सतंप्त महिला व पुरुष यांनी निवेदन देवून थेट दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा नेला व समज देवून दारु विक्री तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशनला जावून कारवाईची मागणी करु अशी विनंती करीत शांततेत दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा काढुन समज दिली.

गावात तीन चार ठिकाणी अवैध हातभट्टीची पन्नी दारु व देशी विदेशी दारु राजरोजपणे विक्री करीत असलेल्या दारु विक्रेत्यानी महिलांच्या विनंतीला मान देत दारु बंद करण्यासाठी होकार दिला तर काहींनी दबंगगीरी करीत असल्याचे बोलले जात आहे.

या निवेदनात वर्षा चौधरी, ललीता चौधरी, सुनिता पाटील, मंगलाबाई पाटील, ज्योति सोनवणे, स्वाती सोनवणे, सह पोलिस पाटील गजानन चौधरी, समाधान सोनवणे, ग्रामपंचायत उपसरपंच सुर्यभान पाटील, योगराज चौधरी सह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.