सैनिकाच्या घरी चोरी…घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी, एलसीबी पथकाकडून पाहणी

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंदखेडराजा तालुक्यातील गाव लिंगा येथे अज्ञात चोरट्याकडून ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने व नगदी ३० हजार रूपयांची धाडसी चोरी करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती की, गणेश बाजीराव मुंढे भारतीय सैनिक रा लिंगा यांच्या घरी रात्री अज्ञात चोरट्यांनी रात्री मुख्य गेटचे व दरवाज्याचे कुलुप तोडुन घरातील सोन्याचे दागिण्यासह नगदी रोकड सह ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटीलसह किनगाव राजाचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बुलढाणा येथुन डाँगस्काँड पथक ठसे तज्ञ पथकास प्रचारण करून पुढील तपासाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी शितल गणेश मुंढे (वय २०) राहणार लिंगा व त्यांची सासू द्वारकाबाई मुंढे या देऊळगाव राजा येथे त्यांचा भाचा हर्षल घुगे यास भेटण्याकरीता गेले असता २८ /१० /२३ च्या सकाळी साडे सातच्या दरम्यान फिर्यादी यांचे दीर गजानन मुंडे यांनी गेट आणि घराचे कुलूप तोडले असल्याचे भ्रमणध्वनी वरून सांगितले. घरात जाऊन बघितले असता, घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते. तसेच बेडरूम मधील लोखंडी बेडच्या बॉक्समध्ये ठेवलेले स्टीलच्या डब्यामध्ये मोठे गंठण, नाकातील नथ, नेकलेस, झुंबर वेल, कारले मणि , डोरले मनी, अंगठी, गोलमण्यांची पोत असे सोन्याचे दागिने तर चांदीचे जोडवे, नगदी रोख रक्कम ३० हजार रुपये असे एकूण ३ लाख ५७ हजार रुपये ५०० रुपयाचे सोन्याचे व चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दतात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार पोलीस स्टेशन किनगाव राजा यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच बुलढाणा डाँग स्काँड NPCराजेश पदाने, विलास पवार हे श्वान जुली सह,फिंगरप्रिंट ब्युरो चे नितिन चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ठाणेदार दत्तात्रय वाघमारे ,पोलिस उपनिरीक्षक गजानन केदार, बिट जमादार गणेश डोईफोडे, गिते साहेब, शिवाजी बारगजे, पोलीस सवडेपाटील, आदीनी घघटनास्थळी भेट दिली

Leave A Reply

Your email address will not be published.